नवोदय प्रवेश परिक्षा पेपर कसा सोडवावा?

         उद्या नवोदयची परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षांच्या युगात मुलांना स्पर्धा परिक्षांची ओळख करून देणारी ही प्रारंभिक परिक्षा आहे. नवोदय परिक्षेपासूनच मुलांना स्पर्धा परिक्षेची ओळख होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वर्षभर भरपूर अभ्यास केलेला आहे. आता प्रत्यक्ष परीक्षेच्या काळातलं नियोजन योग्य पद्धतीने केल्यास परीक्षेत यश मिळवणं अवघड नाही.

navoday exam paper kasa sodvava, नवोदय प्रवेश परिक्षा पेपर कसा सोडवावा

परीक्षेपूर्वीचं नियोजन

        परीक्षेत यश मिळावं म्वहणून वर्षभर सातत्याने प्रयत्न करावे लागतात. उद्या नवोदय परीक्षेच्या वेळी काय करायला हवं, त्याचा विचार करू. परीक्षा जशी जवळ येऊ लागते, तसे टेन्शन येते.  ‘अतिताण’  नकारात्मक परिणाम करणारा ठरू शकतो. ताणाची काही लक्षणं पाहा.
  • नाडीचे ठोके वाढणे. 
  • हृदयाची धडधड वाढणे. 
  • बेचैन वाटणे.
  • हातापायांची मुंग्या येणे.
  • डोळ्यांना थकवा आल्यासारखं वाटणं. 
  • नापास होण्याचे विचार मनात येणं. 
  • शरीरात जडपणा येणे.
  • थकवा जाणवणे. 
  • भूक कमी होणे.
  • खूप खावेसे वाटणे.
 वरील लक्षणं दिसत असल्यास तुम्ही टेन्शन घेतलंय असं समजा, असं समजा. हा ताण कसा घालवायचा यावर काही उपाय पाहू.

दीर्घ श्वसन 

        मन व शरीराचं संतुलन टिकवायचं असेल तर श्वसनावर नियंत्रण ठेवायला हवं. मेंदूला प्राणवायूचा पुरवठा नीट झाला तर  थकवा येत नाही. दीर्घ श्वसनाने कार्यक्षमता वाढते. श्वास सावकाश घ्यावा. काही क्षण तो फुफ्फुसांमध्ये रेंगाळू द्यावा. हळूहळू बाहेर सोडावा. प्रश्नपत्रिका हातात आल्यावर आलेला ताणही दीर्घ श्वसनाने नियंत्रणात येतो.

सकारात्मक चित्र पहा

        नवोदय परिक्षेत आपण पास होणारच असा विचार करा. निवांत ठिकाणी शांतपणे बसून दहा  वेळा दीर्घ श्वसन करा.  मन प्रसन्न करणारं संगीत ऐका. डोळे बंद करा. मनाला परीक्षेविषयी  सकारात्मक चित्र दाखवा. माझा पूर्ण अभ्यास झाला आहे. मी आत्मविश्वासाने परीक्षाकेंद्रात जात आहे. सर्व प्रश्न मला चांगले सोडवता येत आहेत.  मी बरोबर उत्तरे लिहीत आहे. असे चित्र डोळ्यासमोर आणा. यामुळे मनोबल वाढते, हे संशोधकांनी सिद्ध केलेले आहे. 

    परीक्षेच्या आधी नवीन अभ्यास करण्याऐवजी आतापर्यंत केलेल्या अभ्यासाचा राव करा. नवोदयचा पेपर कमी वेळात अचूकपणे कसा सोडवता येईल त्याचा विचार करा. 

नवोदय परीक्षा काळातले भोजन

    नवोदय परीक्षेच्या काळात तणावामुळे जेवनाच्या सवयी बदलतात. जास्त अभ्यास करण्याच्या नादात झोप होत नाही. तेलकट, अरबट-चरबट पदार्थ पोटात जातात.  या सर्वाचा परिणाम शरीरावर होतो. अ‍ॅसिडिटी वाढते, डोके दुखायला लागतं, आदी त्रास सुरू होतात.

परिक्षेच्या काळात  काय खावे?

  • दूध, ताक, लोणी, तूप आदी उर्जा देणारे पदार्थ

  • फुलका, पोळी, ज्वारी-बाजरीची भाकरी, वरण-भात, खिचडी आदी  पचायला सोपे पदार्थ.
  • मूग, तूर, मटकी, मसूर आदींच्या  प्रथिनयुक्त उसळी.
  • पालक, मेथी, दुधी, पडवळ, भेंडी, घोसाळी, आदी हिरव्या भाज्या.
  • द्राक्षं, पपई, सफरचंद, संत्री, मोसंबी, डाळींब आदी जलयुक्त फळं.

काय खाऊ नये?

    चीज, पनीर, श्रीखंड, आंबट दही, आइस्क्रीम, कोल्ड्रींक्स, सीताफळ, पेरू, फळांपासून तयार केलेले मिल्कशेक्स, प्रोसेस्ड फूड यांना चुकूनही हात लावू नका.

परीक्षाकाळातली दिनचर्या कशी असावी? 


सकाळी लवकर उठा.

    थोडा वेळ फिरायला जा. सूर्यनमस्कार करा. जेणेकरून शरीरात रक्ताभिसरण वाढेल. फ्रेश वाटेल. मनावरचा ताण हलका होईल. उन्हात बाहेर पडू नका. बाहेर जाताना डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ घाला. कडक उन्हापासून डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी गॉगलचा वापर करा. अभ्यास करून डोळ्यांवर ताण येतो. तेव्हा थोडा वेळ डोळे बंद करून त्यावर  थंड पाण्याचे ङबके मारा.

परीक्षाकाळात काय काळजी घ्याल?

  • रात्रीचं जागरण टाळावं. 
  • प्रवेश पत्र दोन प्रतीत जवळ ठेवा.
  • दोन काळ्या किंवा निळ्या शाईचे पेन सोबत ठेवा.
  • कच्च्या कामासाठी पेन्सिल व रबर सोबतअसू द्या.
  • अकारण साहसी प्रयोग करू नका. उदा. झाडावर चढणं, अवजड वस्तू उचलणं. 
  • सुरी, कात्री असल्या धारदार वस्तूंचा वापर करू नका. 
  • परीक्षेच्या ठिकाणी जाताना लवकर निघा वेळेत पोहोचा.
  • परीक्षा हॉलमध्ये पोहोचल्यावर तसेच पेपर लिहिताना कोणाशी बोलू नका.
  •  तहान लागत असल्यास लेमन गोळ्या सोबत ठेवाव्यात. 
  • उत्तरपत्रिकेवर सर्व माहिती योग्य ठिकाणी भरा. 
  • उत्तरपत्रिकेवर योग्य ठिकाणी स्वतःची सही करा.
  •  उत्तरपत्रिकेवर कुठेही स्वतचं नाव, पत्ता, फोन नंबर, जात, धर्म इत्यादी गोष्टी लिहू नका.
  • आधी सर्व प्रश्नपत्रिका वाचून काढा. 
  • जो प्रश्न सोपा वाटत असेल, तो आधी सोडवा. 
  • एखादा प्रश्न अवघड वाटत असेल त्यावर वेळ न घालवाता पुढे जा.
  • एखादे गणित केणत्याच सूत्रात बसत नाहीअसे वाटेल तेव्हा त्यातले पर्याय ताडून पहा.
  • उतार्यावरील प्रश्न सोडवताना उतारा प्रमाण माना. मनाने उत्तरे लिहू नका.

        परीक्षेच्या काळात पालकांनी तसंच हितचिंतकांनीसुद्धा आपल्या उत्साहाला आणि चिंतेला आवर घाला. विद्यार्थ्यावर शुभेच्छांचा भडीमार करू नका. याचेदेखील विद्यार्थ्यांवर नकळत दडपण येते हे लक्षात घ्यावे.



Post a Comment

Previous Post Next Post