अध्यक्ष महोदय, पूज्य गुरूजन, उपस्थित बालमित्र आणि गावातील सर्व प्रतिष्ठीत नागरिकहो. आज आपण या ठिकाणी राजमाता, राष्ट्रमाता, स्वराज्यजननी आऊसाहेब जिजामाता यांना अभिवादन करण्यासाठी जमलो आहोत.
![]() |
राजमाता जिजाऊ जयंती भाषण |
आज आपण मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत मस्तपैकी धांगडघिंगा घालत करीत आहोत. पण एक काळ असा होता की, तुम्हाला लग्न करायचं असेल तरीही परवानगी मागावी लागायची. तुम्हाला गावात सप्ताह करायचा असला, यात्रा साजरी करायची असली तरी परकीय मुसलमानी राजवटीसमोर नाक घासून परवानगी मागावी लागायची. कोणताही उत्सव चोरून लपून साजरा केला जायचा. तुमच्या डोळ्यादेखत तुमच्या लेकीबाळींना घरातून घूसून ओढून नेलं जायचं. उभ्या पिकात घोडे घातले जायचे. लेकराबाळाच्या तोंडातला घास हिरावला जायचा. गोठ्यातलं सुंदर जीवापाड जपलेले जनावर डोळ्यादेखत घेऊन जायचे. आपण फक्त बघत राहायचो.
ज्यांच्या मनगटात या अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ होतं ती सगळी मूग गिळून चूप बसली होती. सुलातानांची चाकरी करीत होते. विरोध करण्याची कोणाची हिंमत नव्हती. सगळी प्रजा गरीब गायीसारखी अन्याय सहन करीत होती. ज्या देवगिरीच्या वैभवाचा विश्वात बोलबाला होता, तिची राख रांगोळी केली होती अल्लाउद्दीन खिलजीने. जिकडे तिकडे अन्याय. गुलामगिरी, शोषण,अत्याचार अनाचार माजला होता. सगळीकडे दुखाचा अंधार पसरला होता. रयतेला कोणी वाली नव्हता.
अशा या अंधकारयुगात सिंदखेडच्या लखूजी जाधवांच्या घरात जन्म झाला एका समरभवानीचा. होय हीच ती महाराष्ट्र जननी, राजमाता जिजाऊ. ज्यांच्या उदरातून अवघ्या विश्वाला स्वातंत्र्याचा प्रकाश देणार्या स्वराज्य सूर्याचा जन्म झाला. अन्यायाचा अंधार दूर झाला आणि महाराष्ट्र परक्यांच्या गुलामीतून मुक्त झाला. डोंगरात राहणारा आणि चटणी भाकरी खाणारा एकुणएक मावळा उभा राहिला आणि शिवबांच्या खांद्याला खांदा देऊन लढाइला सज्ज झाला.
पण ज्याच्या ध्येयासाठी प्राण द्यायला उभा महाराष्ट्र तयार जाला असा राजा घडविताना त्या माऊलीला काय यातना झाल्या असतील याची आजच्या सोफ्यावर बसून मालिका पाहणार्या मम्मीला काय कल्पना येणार.स्वतच्या पोटचा गोळा त्या माऊलीने काळजावर दगड ठेूऊन अफजलखानासारख्या राक्षसाशी लढायला पाठवला. त्याच्या यशासाठी वाटेल तितके प्रयत्न केले. म्हणून वाचला महाराष्ट्र. पंढरपूर, तुळजापूर आणि तुम्ही आम्ही.
जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर सर्वांची सुन्नत जाली असती. काशीची कला गेली असती आणि मथुरेची मदिना झाली असती. आणि जर राजमाता जिजाऊ नसत्या तर या राष्ट्राला हिंदुपदपातशहा मिळाला असाता काय. शिवरायानंतर ज्यांनी स्वराज्याचा विजयाचा ध्वज उंच धरला त्या महान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनाही घडविणार्या राजमाता जिजाऊच होत्या. या देशाला दोन दोन महानायक देणार्या त्या राष्ट्रमातेला कोटी कोटी वंदन. जय हिंद, जय भारत.
Post a Comment