एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकावर आधारित ऑनलाइन प्रशिक्षण


bilingual training, scert training link
dwibhashik prahikshan

 वर्ष 2022-23 करिता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळामार्फत पहिलीच्या व दुसरीच्या वर्गासाठी एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील मराठी व उर्दू माध्यमांच्या सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळामधील पहिली व दुसरीच्या वर्गाला शिकविणार्या शिक्षकांना एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकावर आधारित ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत दिनांक 17 ऑगस्ट व 18 ऑगस्ट 2022 रोजी खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण वर्गासाठी मराठी व उर्दू माध्यमांच्या सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळामधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकाना तसेच 488 आदर्श शाळामधील इयत्ता दुसटीच्या वर्गाला अध्यापन करणार्या शिक्षकांना (फक्त मराठी माध्यम) उसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील कार्यरत आदर्श शाळा संपर्क अधिकार्यांना नमूद कालावधीत उपस्थित राहण्यास सांगावे. सदर प्रशिक्षण ऑनलाईन होणार असून खालील वेळापत्रकानुसार व युट्युब लिंकनुसार सदर प्रशिक्षणास उपस्थित राहणे आवश्यक आहे. (youtube लिंक लवकरच येथे उपलब्ध केल्या जातील.)


Post a Comment

Previous Post Next Post