![]() |
teachers-transfer |
शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या हा सर्वच प्रशासनाचा आणि सर्व घटकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. याविषयी कुठल्याही प्रकारचे ठराविक धोरण शासनाकडे नाही. किंबहुना कायम धरसोडीचा प्रकार यामध्ये केला जातो. त्या मध्ये आज एक नवीन परिपत्रक शासनाने जारी केले आहे. या परिपत्रकाप्रमाणे शिक्षकांच्या बदल्या यांविषयीची संदिग्धता अजूनच वाढलेली आहे; कारण यामध्ये शिक्षकांच्या बदल्या केव्हा केल्या जातील याविषयी काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा शाळा शिक्षकांच्या बदल्या करण्याविषयी विचार करण्यात येईल अशा प्रकारचे मोघम स्वरूपाचे विधान यामध्ये केल्याचे दिसते. त्यावरून शिक्षकांना बदल्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे आश्वासन देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या शाळा सुरू झाल्यावर देखील होतील याची कुठल्याही प्रकारची ग्वाही दिलेली नाही. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतरही शिक्षकांच्या बदल्या होतील का? तर या प्रश्नाचे उत्तर अजूनही संदिग्ध स्वरूपाचे आहे. अजून या शासन परिपत्रकांमध्ये काय म्हटलेले आहे ,हे वाचण्यासाठी खालील पीडीएफ ओपन करून पहा किंवा डाऊनलोडही करु शकता. धन्यवाद
Post a Comment